ट्विटरला ‘व्देषाचं व्यासपीठ’ सांगत ‘या’ 5 बड्या सेलिब्रेटींनी डिअ‍ॅक्टीव्ह केलं अकाऊंट, ही वाचा यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बऱ्याचदा ट्विटरवर बॉलिवूड सेलिब्सना ट्रोल केले जाते आणि त्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या बातम्या ऐकायला मिळत असतात. आता युजर्सच्या अशा वागण्यामुळे सेलेब्सही त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात लोकांच्या अशा वागणुकीमुळे कंटाळलेल्या 5 सेलिब्रिटींनी त्यांचे खाते डिलीट कले. बहुतेक सेलिब्रिटींनी ट्विटर सोडण्याचे कारण द्वेष असल्याचे सांगितले आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की आता या प्लॅटफॉर्मवर द्वेष पसरवला जात आहे. दरम्यान, या आठवड्यात कोणकोणत्या सेलिब्रिटींनी ट्विटरला निरोप दिला आणि त्यांचे शेवटचे ट्विट कोणते होते जाणून घेऊयात.

1. सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हाने तिच्या अकाऊंटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते, सोनाक्षीने एका पुरस्कार सोहळ्यातील एमी पोहलरचा GIF शेअर करत लिहले आहे की, स्वत:चे रक्षण करण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे नकारात्मकतेपासून दूर राहणे आणि या दिवसात ट्विरटरपेक्षा अधिक आहे ! चला, मी माझे खाते बंद करीत आहे, गुडबाय मित्रांनो.

2. शशांक खेतान
चित्रपट दिग्दर्शक शशांक खेतान यांनीही नुकतेच त्यांचे ट्विटर अकाऊंट डिएक्टिव्हेट करण्याच निर्णय घेतला आहे. ते म्हणतात की, हा प्लॅटफॉर्म द्वेष आणि नकारात्मकता पसरविण्याचे मैदान बनले आहे. ट्विटवरसोबत बरेच काही झाले. हे द्वेष आणि नकारात्मकतेचे एक मैदान बनले आहे, दुर्दैवाने असे एक शक्तीशाली व्यासपीठ आहे आणि चांगले जग निर्माण करण्यासाठी याचा वापर केला गेला नाही. शांती आणि प्रमेसाठी नेहमीच प्रार्थना करा, मी माझे अकाऊंट डिएक्टिव्हेट करत आहे.

3. साकीब सलीम
हवा हवाई, दिल जंगली आणि रेस सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या या अभिनेत्याने ट्विटरला गड बाय म्हटले आहे. साकीबने ट्विटरवर लिहले, ट्विटर मी तुमच्यापासून दूर जात आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहले आहे, हॅलो ट्विटर, जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही प्रेमळ होता. भावना व्यक्त करणे, ज्ञान मिळवणे आणि भिन्न दृष्टिकोन समजून घेणे हे एक उत्तम व्यासपीठ होते. पण, आता प्रत्येकजण द्वेषात हरवला आहे. पुढे त्यांनी आपल्या पत्रात बरेच काही लिहले आहे.

https://twitter.com/Saqibsaleem/status/1274295075317542913

4. आयुष शर्मा
सलमान खानचे मेहुणे आयुष शर्मा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेवटच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 280 शब्द कोणत्याही मनुष्याला परिभाषित करण्यासाठी लहान आहे. परंतु फेक न्यूज, द्वेष आणि नकारात्मकता पसरवण्यासाठी 280 शब्द पुरेसे आहेत. या मानसिकतेसाठी साइन अप केले नाही. खुदा हाफिज.

5. झहीर इकबाल
झहीर इक्बाल यांनी आपल्या शेवटच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहले, गुड बाय ट्विटर.

https://www.instagram.com/p/CBqTgGGJX7-/?utm_source=ig_web_copy_link