34 दिवसात ‘या’ 10 कलाकारांचं निधन, बॉलिवूडसाठी काळ बनलंय 2020 चं वर्ष !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2020 चं हे वर्ष जणू काळ बनून समोर आला आहे. आधीच जग कोरोनाशी लढत आहे. अशात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या 34 दिवसांत जवळपास 10 कलाकारांचं निधन झालं आहे. जाणून घेऊयात ते कोण आहेत.

1) इरफान खान – बॉलिवूड स्टार इरफान खानला तब्येत अचानक बिघडल्यानं मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. इरफान खानचं दि 29 एप्रिल (बुधवारी) निधन झालं आहे. ही खबर ऐकताच त्याच्या लाखो चाहत्यांची निराशा झाली आहे. 2018 साली इरफान खानला आपल्या मेंदूत न्यूरोएंडोक्राईन ट्युमर असल्याचं समजलं होतं. यावर त्यावर त्यानं उपचारही घेतले होते. इरफानच्या मृत्यूचा साऱ्यांनाच धक्का बसला होता.

2) ऋषी कपूर – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं दि 30 एप्रिल 2020 रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं सिनेमा जगताला मोठा धक्का बसला. ते 67 वर्षांचे होते. 30 एप्रिलच्या सकाळी 8.45 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचं कुटुंबाकडूनही सांगण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपासून ते Leukemia नं ग्रस्त होते. ऋषी यांच्या निधनानंतर देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह देशातील अनेक बड्या नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. इरफान गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ऋषी यांनी जग सोडलं.

3) योगेश गौर – बॉलिवूडमध्ये एकाहून एक गाणी देणाऱ्या योगेश गौर यांचं 29 मे 2020 रोजी निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की, 16 वर्षांच्या वयात लखनऊवरून मुंबईला आलेल्या योगेश यांनी एका सिनेमासाठी गाणी लिहिली होती. ऋषीकेश मुखर्जी यांनी ही गाणी ऐकली आणि आनंद सिनेमात त्यांना संधी दिली होती. कही दूर जब दिन ढल जाए आणि जिंदगी कैसी है पहेली हाय ही गाणी योगेश यांनी लिहिली आहेत.

4) मोहित बघेल – बॉलिवूडचा यंग कॉमेडी अ‍ॅक्टर मोहित बघेल यानंही 23 मे 2020 रोजी जगाचा निरोप घेतला आहे. मोहित 27 वर्षांचा होता. त्याला कॅन्सर झाला होता. त्यानं होमटाऊन मथुरेत शेवटचा श्वास घेतला. निधनाच्या आदल्या रात्रीच त्याची तब्येत खराब झाली होती. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. यानंतर त्यानं जागाला अलविदा केलं. त्यानं सलमान खान परिणिती चोपडा अशा अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं होतं.

5) मनमीत ग्रेवाल – चॅनल सब टीव्ही वरील शो आदत से मजबूर मध्ये काम केलेल्या अभिनेता मनमीत ग्रेवाल यानं शुक्रवारी (दि 15 मे) आत्महत्या केली आहे. 32 वर्षीय मनमीतनं शुक्रवारी रात्री गळफास घेऊन जीवनयात्रा समाप्त केली. मनमीत पत्नीसोबत नवी मुंबईच्या खारघरमध्ये रहात होता. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळं मनमीत खूप परेशान होता. लॉकडाऊनमुळं त्याच्या कमाईला पूर्णविराम लागला होता. यामुळंच तो डिप्रेशनमध्ये गेला होता.

6) अभिजीत – शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेंमेंटचे खास सदस्य अभिजीत यांचं निधन झालं आहे. असं सांगितलं जात आहे की, शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान सुरुवातीपासून रेड चिलीज एंटरटेंमेंटला जोडले गेले होते. अभिजीतच्या निधनानंतर शाहरुख म्हणाला होता की, “आम्ही सर्वांनी ड्रीम्स अनलिमिटेडसोबत सिनेमा बनवण्याचा प्रवास सुरू केला. अभिजीत माझा सर्वात चांगला सहकारी होता. आम्ही चांगलं केलं आणि काही चुकीचंही. परंतु नेहमीच पुढे जात राहिलो. तो टीमचा खूप मजबूत सदस्य होता. तू नेहमीच आठवशील मित्रा.”

7) सचिन कुमार – टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि कहानी घर घर की मध्ये काम करणाऱ्या सचिन कुमारचं निधन झालं. 15 मे 2020 रोजी जगाचा निरोप घेणारा सचिन बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा कजन होता. मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. त्याचा को अ‍ॅक्टर हंसराज यानी सचिन कुमरच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आणि याबाबत माहिती दिली होती. त्याचे मित्र राकेश पॉल, विनीत रैना, सुरभि तिवारी यांनीही दु:ख व्यक्त केलं होतं. सचिन कुमारनं कहानी घर घर की आणि लज्जा मालिकेत निगेटीव्ह रोल साकारला होता. परंतु नंतर त्यानं अभिनय सोडून फोटोग्राफर म्हणून ओळख तयार केली होती.

8) अमोस – बॉलिवूड स्टार आमिर खानचा असिस्टंट अमोस यांनी 12 मे 2020 रोजी जगाचा निरोप घेतला. ते 60 वर्षांचे होते. हार्ट अटॅकनं त्यांनी आपला जीव गमावला.

9) साई गुंडेवार – पीके आणि रॉक ऑन सारख्या सिनेमात काम केलेल्या अभिनेता साई गुंडेवारचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईचं रविवारी (दि 10 मे) अमेरिकेत निधन झालं आहे. दीर्घकाळापासून तो कॅन्सरसोबत झुंज देत होता. अशी माहिती समोर आली आहे की, खूप दिवसांपासून साई या खतरनाक ब्रेन कॅन्सरसोबत लढत होता. गेल्या वर्षीपासून लॉस एंजिल्समध्ये त्याच्या या ब्रेन कॅन्सरवर उपचार सुरू होते. त्याच्यामागे त्याची पत्नी आणि आई वडिल आहेत.

10) शफीक अन्सारी – बॉलिवूडमधील दोन महान कलाकार ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला. दोघांचंही निधन कॅन्सरनं झालं होतं. यानंतर आता आणखी एका अभिनेता क्राईम पेट्रोलमधील शफीक अन्सारी यांचंही कॅन्सरमुळं निधन झालं. शफीक यांनी क्राईम पेट्रोल या मालिकेत अनेक भूमिका साकारल्या आहेत. दीर्घकाळापासून ते कॅन्सरसोबत झुंज देत होते. 10 मे 2020 रोजी 52 वर्षीय शफीक यांनी अखेरचा श्वास घेतला.