फिल्मी बॅकग्राऊंड असूनही नाही चालली ‘या’ 7 स्टार्सची जादू !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लुक्स, टॅलेंट, फिजीक, पर्सनॅलिटी फिल्म इंडस्ट्रीत महत्त्वाची मानली जाते. परंतु कधी कधी हे सगळं असून आणि कलाकार फिल्मी बॅकग्राऊंडमधून असूनही त्यांची जादू चालत नाही. अशाच काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) सिकंदर खेर – अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेरचा मुलगा सिकंदर खेर टॅलेंटेड असूनही अद्याप आपली ओळख तयार करू शकलेला नाही. अनेक सिनेमात रोल करूनही त्याला मोठा ब्रेक मिळालेला नाही. आगामी वेब सीरिज आर्यामध्ये तो दिसणार आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1270727164057378817?s=20

2) सोहा अली खान – फेमस अ‍ॅक्ट्रेस शर्मिला टागोरची मुलगी सोहा अली खान हिनं अनेक सिनेमात लिड रोल केला तरीही ती एक मोठी स्टार बनू शकली नाही.

https://twitter.com/30Kumaar/status/1270727220193980417?s=20

3) बॉबी देओल – ज्येष्ठे अभिनेते धर्मेंद्र यांचा लहान मुलगा बॉबी देओल यालाही भाऊ सनी देओल आणि वडिल धर्मेंद्र प्रमाणं यश मिळालं नाही. चांगली सुरुवात करूनही फ्लॉप हिरोचा टॅग त्याला लागला जो आजही कायम आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1270727295876173828?s=20

4) प्रतिक बब्बर – राज बब्बर आणि दिग्गज स्टार स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर अनेक बड्या सिनेमात करून अद्यापही स्थापित होऊ शकला नाही. त्यानं वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. प्रतिक गुड लुकिंग आणि टॅलेंटेड अ‍ॅक्टर आहे तरीही अद्याप स्थापित झालेला नाही.

https://twitter.com/30Kumaar/status/1270727367628120065?s=20

5) जॅकी भगनानी – दिग्गज फिल्म प्रोड्युसर वासु भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी यानं 2009 साली आलेल्या कल किसने देखा सिनेमातून डेब्यू केला होता. परंतु हा सिनेमा फ्लॉप झाला. यानंतर फालतू सिनेमानं त्याला लाईमलाईट मिळाली. अनेक सिनेमात काम करूनही त्याला अद्याप यश मिळालेलं नाही.

https://twitter.com/30Kumaar/status/1270727428869160960?s=20

6) कुमार गौरव – प्रसिद्ध अ‍ॅक्टर राजेंद्र कुमारचा मुलगा कुमार गौरव यानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली तेव्हा सर्वांना वाटलं की, तो दीर्घकाळ टिकेल. अनेक हिट सिनेमे देणारा हा चॉकलेट हिरो नंतर स्टार्सच्या गर्दीत गायबच झाला.

https://twitter.com/30Kumaar/status/1270727507378085889?s=20

7) संजय कपूर – प्रसिद्ध फिल्म प्रोड्युसर सुरेंद्र कपूरचा मुलगा सजय कपूरनंही इंडस्ट्रीत पाऊल टाकलं होतं. त्याचे भाऊ बोनी कपूर आणि अनिल कपूरही इंडस्ट्रीत आले. बोनी प्रोड्युसर बनून यशस्वी झाले. अ‍ॅक्टींगमध्ये अनिलनं नाव कमावलं. परंतु संजयला मात्र वडिल आणि भावांप्रमाणं यश नाही मिळालं.

https://twitter.com/30Kumaar/status/1270727566396178433?s=20