Chhichhore First Review : छिछोरे पाहून लोकांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया, जरूर पहा सिनेमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांतसिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा आणि प्रितीक बब्बर या सारख्या अनेक मोठ्या स्टार्सनी भरलेला ‘छिछोरे’ चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. 2016 मध्ये आलेल्या ‘दंगल’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे सोशल मीडियावर खूप चांगले रिव्ह्यूज मिळत आहेत. अनेकांनी हा चित्रपट पाहून आल्यावर सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत रिव्हीव्यू दिले आहेत.

जर ट्विटरवरील #Chichichorereview ट्रेंडिंगकडे पाहिले तर तुम्हाला कळेल की प्रेक्षकांना हा चित्रपट पाहून खूप आनंद झाला आहे. या चित्रपटाविषयी लोकांना ज्या ज्या गोष्टी आवडल्या त्या बद्दल लोकांनी लिहिले आहे.


छिछोरे बद्दलची सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे बर्‍याच लोकांना चित्रपटाच्या माध्यमातून कॉलेजच्या ताज्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. या चित्रपटासाठी प्राप्त झालेल्या प्रेक्षकांच्या रेव्हिवमध्ये बर्‍याच लोकांनी याचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट अशा मित्रांची कहाणी आहे जी तुमच्या आयुष्यात कोठेतरी दिसतील. प्रेक्षकांच्या रिव्हूवबद्दल बोलताना एका युजरने लिहिले की – ‘सुशांत आणि श्रद्धा कपूरच्या चित्रपटामध्ये मैत्री, भावना आणि खूप मजबूत संदेश आहे. हा चित्रपट पाहून कॉलेजचे दिवस आठवले’.

दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘हा चित्रपट यावर्षीचा सर्वात मनोरंजक चित्रपट आहे. हा चित्रपट बनविला त्या संपूर्ण टीमने कौतुकास्पद काम केले आहे. त्याचबरोबर काही युजर्सनी चित्रपटाच्या पहिल्या हाफबद्दल असे लिहिले आहे की, मी या चित्रपटाद्वारे माझे कॉलेजचे दिवस जगत आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक पात्राची कामगिरी छान आहे.

या चित्रपटानंतर ‘छिछोरे’शी संबंधित प्रत्येक अभिनेत्याचे कौतुक होत आहे. त्याचे नाव ज्या प्रकारे आहे, हा चित्रपट अगदी ‘छिछोरे’ सारखा नाही. या चित्रपटाच्या विनोदी, प्रणयापासून ते भावनिक दृश्यांपर्यंत सर्व काही अचूक दिसत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत या चित्रपटासाठी सर्वाधिक कौतुक होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like