‘मला सावळ्या रंगामुळं नाही मिळाल्या मॉडेलिंग असाईनमेंट’, अभिनेत्रीचा ‘गौप्यस्फोट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) हिला सावळ्या रंगामुळं भेदभावाचा सामना करावा लागला आहे. तिनं पहिल्यांदाच यावर खुलून भाष्य करत काही खुलासे केले आहेत. लहानपणापासून मोठं होईपर्यंत डिस्क्रीमिनेशनचा सामना करावा लागला आहेच शिवाय मॉडेलिंगमध्येही तिला या गोष्टींचा सामना करावा लागला आहे असं तिनं सांगितलं आहे. सावळ्या रंगामुळं मला मॉडेलिंग असाईनमेंट दिल्या गेल्या नव्हत्या असं ती म्हणाली आहे.

गेल्या महिन्यात चित्रांगदानं इंस्टा स्टोरी शेअर केली होती. यात ती म्हणाली होती की, तपकिरी आणि आनंदी आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, त्वचेच्या रंगाच्या आधारावर खूप जास्त डिस्क्रीमिनेशन होतं. प्रत्येक जण घरातून व्हाईट स्किनवाल्या लोकांच्या शोधात निघत नाही.

एका वृत्रपत्रासोबत बोलताना तिनं सांगितलं की, सावळ्या रंगाच्या रुपातील मुलगी म्हणून जीवन जगण्याची भावना मला माहित आहे. असं नाही लोक थेट तुमच्या तोंडावर बोलतील. तुम्ही फक्त हे समजू शकता. लहानपणापासून मी अनेकदा या पूर्वाग्रहातून गेले आहे.

पुढं ती म्हणते, मी सावळी असल्यानं मला मॉडेलिंगच्या असाईनमेंटमध्ये घेतलं गेलं नव्हतं. मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसात मला सांगितलं जायचं की, तू खूप सावळी आहेस. माझ्या त्याच ऑडिशनला गुलजार सरांनी पाहिलं. यानंतर त्यांनी मला त्यांच्या म्युझिक व्हिडीओत काम दिलं. नंतर मला प्रोत्साहन मिळालं की, प्रत्येकजण गोऱ्या रंगाच्या आधारावरच काम नाही देत.

 

चित्रांगदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एका शॉर्ट फिल्ममध्ये काम करताना दिसणार आहे. खास बात अशी की, या सिनेमाचे डायलॉग आणि स्क्रीनप्ले चित्रांगदानं लिहिले आहेत.