सरोज खान सुपुर्द-ए-खाक, साश्रू नयनांनी कुटुंबीयांनी दिला अखेरचा निरोप !

पोलिसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खाननं जगाचा निरोप घेतला आहे. कार्डियक अरेस्टमुळं मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्यानं त्यांना बांद्र्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (शुक्रवार दि 3 जुलै 2020) त्यांना मालाड येथील कब्रिस्तानात सुपुर्द-ए-खाक करण्यात आलं. त्यांना अखेरचा निरोप देण्याासाठी त्यांचे काही कुटुंबीय आणि जवळचे नतेवाईक उपस्थित होते.

सरोज खानच्या निधनानंतर त्यांचे अनेक चाहते आणि इंडस्ट्रीतील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील कोरोनाच्या केसेस पाहता पोलिसांनी सरोज खआनच्या कुटुंबाला निर्देश दिले होते की, अंत्यसंस्कारात 50 हून अधिक लोक उपस्थित नसावेत. पोलिसांच्या या निर्देशानंतर कुटुंबियांनी निर्णय घेतला की, वेळ न दवडता सकाळीच त्यांना सुपुर्द-ए-खाक करण्यात यावं.

सरोज खान डायबिटीज आणि संबंधित आजारांनी ग्रस्त होत्या. यामुळं त्यांनी आपल्या कामातून दीर्घकाळ ब्रेक घेतला होता.

71 वर्षीय सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. 50 दशकात त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. आपल्या 4 दशकाच्या करिअरमध्ये त्यांनी 2000 हून अधिक गाणी कोरियोग्राफ केली आहेत.