Cinema Halls Reopen : सिनेमागृह उघडताच कियारा आडवाणीचा हा सिनेमा होणार रिलीज, जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम : सहा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर देशभरातील सिनेमा हॉल उघडणार आहेत. गृहमंत्रालयाने सिनेमा हॉल काही अटींसह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु हा निर्णय प्रत्येक राज्याकडे सोपवण्यात आला आहे. १ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल सुरू होणार आहेत. केवळ 50 टक्के जागा प्रेक्षकांसाठी वापरल्या जातील.

गृहमंत्रालयाच्या या निर्णयानंतर चित्रपटगृहांच्या मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की सिनेमा हॉल उघडताच कोणता चित्रपट प्रथम सिनेमागृहात प्रदर्शित होईल. तर ताज्या बातम्यांनुसार सिनेमा हॉलमध्ये कियारा अडवाणी चा ‘इंदू की जवानी’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पिंकविला शी बोलताना थिएटर मालक म्हणाले, की ‘निखिल अडवाणी हे खूप स्मार्ट आहेत. त्यांनी आतापर्यंत आपल्या चित्रपटाचा फक्त प्रोमो आणि गाणे प्रदर्शित केले आहेत. पण घोषणा केली नाही की हा चित्रपट ते ऑनलाइन प्रदर्शित करणार की नाही. आणि तसेही 50 टक्के प्रेक्षकांची अट असल्याने हा सिनेमा किती कमाई करेल या बाबत साशंकता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like