बालाकोट ‘एअर स्ट्राइक’वर सिनेमाची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तान आर्मीचा ‘तिळपापड’, दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथे पाक समर्थीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी छावण्यांवर भारतीय वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकवर चित्रपट तयार झाल्याने पाकिस्तान सैन्य अस्वस्थ झाले आहे आणि त्यांच्या प्रवक्त्याने ट्विटमध्ये भारतीय चित्रपट निर्मात्यांविरूद्ध आपले मत व्यक्त केले आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी आणि भूषण कुमार यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यांवर चित्रपटाची घोषणा केली होती. भारतातील या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार झाले होते.

चित्रपटाची घोषणा करताना भारतीय चित्रपट निर्मात्यांनी असे लिहिले की “चला, आपण देशाच्या धरणीमातेच्या वीरांचा आदर व्यक्त करूया.” राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा हा चित्रपट २०१९ च्या बालाकोट स्ट्राइकवर आधारित आहे. भारतीय वायुसेनेच्या कामगिरीची कहाणी सांगणारी ही एक कहाणी आहे.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांना हे कुठेतरी खटकले. त्यांनी चित्रपटाच्या एका लिंक वर ट्विट केले,”एक सैनिक म्हणून, सांगायचे आहे की भारत फक्त बॉलिवूड चित्रपटांमधूनच आपल्या इच्छेची पूर्तता करू शकतो.”

विशेष म्हणजे भारतीय अभिनेता विवेक ओबेरॉय यांनीही विंग कमांडर अभिनंदनवर आधारित ‘बालाकोट – द ट्रू स्टोरी’ हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/