Drugs Case : अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांचा जामीन मंजूर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) कॉमेडियन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haras Limbachiyaa) यांना अटक केली होती. रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) किला कोर्टानं भारती आणि हर्ष यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय दोघांकडून जामीन अर्जही दाखल करण्यात आला होता. ज्यावर सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) सुनावणी होणार होती. या सुनावणीनंर आता भारती आणि हर्ष यांचा जामीन एनडीएस कोर्टानं मंजूर केला आहे.

एनसीबीच्या टीमनं शनिवारी महिला कॉमेडियन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haras Limbachiyaa) यांच्या मुंबईतील घरावर छापा मारला होता. अशी माहिती होती की, एनसीबीला भारतीच्या घरी गांजा मिळाला आहे. एनसीबीनं भारती सिंह आणि तिच्या पतीला समन्स बजावलं होतं. यानंतर आता भारती आपल्या पती हर्ष सोबत एनसीबीच्या कार्यालयात आली होती. दीर्घकाळ चौकशीनंतर तिला अटक झाली होती.

You might also like