Coronavirus : ‘आयसोलेशन’मध्ये गेले Big B अमिताभ, हातावर मारला BMCचा शिक्का

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोना व्हायरसच्या भीतीनं अनेक बॉलिवूड स्टार्सनी स्वत:ला घरात बंद करून घेतलं आहे. या यादीत आता बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांचंही नाव समाविष्ट झालं आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी स्वत:ला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बिग बी अमिताभ यांनी स्वत: ट्वटिरवरून याबाबत माहिती दिली आहे. अमिताभ यांनी ट्विटरवरून आपल्या हाताचा एक फोटो शेअर केला आहे. यावर एक स्टॅम्प आहे. यात सेल्फ आयसोलेशन म्हणजेच क्वारंटाईन होण्याबद्दल लिहिण्यात आलं आहे. हा स्टॅम्प बीएमसीकडून त्या लोकांना लावण्याते येत आहे जे क्वारंटाईनमध्ये आहे.

आता बिग बी काही दिवस घरातच बंद राहणार आहेत. असं सांगितलं जात आहे की, 31 मार्चपर्यंत अमिताभ बच्चन घरातच राहणार आहे. बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये इतर लोकांनाही काळजी घेण्यासाठी अपील केलं आहे. अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like