अभिनेते अनुपम खेरच्या आईनं केली ‘कोरोना’वर मात ! अभिनेत्यानं दिले हेल्थ अपडेट्स (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार अनुपम खेर यांनची आई दुलारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. परंतु आता त्यांच्या आईनं कोरोनावर मात केली असून लवकरच त्या घरी परतणार आहेत. खुद्द अनुपम यांनी एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सेस यांचे आभार मानले आहेत.

अनुपम खेर यांनी इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात म्हणत आहेत की, “कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितलं आहे की, मेडिकलच्या सर्व मापदंडांचा विचार करता माझी आई निरोगी आहे. आता ती घरू येऊ शकते. तिला आता कमीत कमी 8 दिवस होम क्वारंटाईन रहावं लागणार आहे. ती वेगानं बरी होत आहे.”

पुढे बोलताना अनुपम म्हणाले की, “आपल्या घराच्या आसापास कोणाला कोरोना झाला तर लोक त्यांच्यापासून अंतर ठेवू लागतात. तसं तर योग्य विचार करून हे केलं जात आहे. मी बाकी लोकांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीही प्रार्थना करतो की, त्यांनीही लवकर बरं व्हावं.”

अनुपम खेर यांची आई दुलारी यांना 12 जुलै रोजी कोरोना झाल्याचं आढळून आलं होतं. याव्यतिरीक्त अनुपम खेर यांचा भाऊ राजू खेर आणि वहिणी सीमा आणि पुतणी वृंदा यांनाही कोरोनाची लागण झाली होती.