Coronavirus : पसरण्यापासून रोखला जाऊ शकतो ‘कोरोना’ ! समोर आला Big B अमिताभचा नवा व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  सोशल मीडियावर कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जाताना दिसत आहेत. परंतु याचा एकमात्र उपाय आहे तो म्हणजे या व्हायरसला पसरण्यापासून वाचवणं. काही गोष्टींबाबतीतही लोकांना खबरदरी घेणं गरजेचं आहे. बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनीही एका व्हिडीओतून याबाबत संदेश दिला आहे.

प्रेस इंफर्मेशन ब्यरो(PIB)नं एक नवीन व्हिडीओ जारी केला आहे. कोरोनाचा आजार पसरवण्यापासून वाचण्यासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी बिग बी व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. खोकताना किंवा शिंकतान रुमाल किंवा टिश्युचा वापर करण्यासाठी ते सांगत आहेत. टिश्यू वपारत असाल तर वापर झाल्यानंतर लगेच तो कचऱ्यात टाकायलाही ते सांगत आहेत. आपले हात वेळोवेळी साबण किंवा सॅनिटायजरनं स्वच्छ करा. थेट डोळ्यांना, तोंडला आणि नाकाला हात लावणं टाळा असंही बिग बी सांगतात.

पुढे बिग बी म्हणाले की, गर्दीत जाणं टाळा. जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि ताप असेल तर दुसऱ्यांपासून दूर रहा. अशी लक्षण दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांची मदत घ्या. रुग्णलयात जाताना तोंडाला रुमाल किंवा मास्क लावूनच जा. कोरोनाचा प्रसार भारतात वेगानं होताना दिसत आहे. यामुळं अद्याप 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. 140 हून अधिक प्रकरणं समोर आली आहेत. सर्वांनाच दक्ष राहण्यास सांगण्यात येत आहे. तसं तर घाबरण्याची गरज नाही परंतु योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे.