Coronavirus : लखनऊला जाण्याआधीच मुंबईत 10 लोकांना भेटली होती कनिका कपूर ! शोध घेताहेत BMC च्या 2 टीम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सिंगर कनिका कपूर सध्या आयसोलेशनमध्ये आहे. कनिकाला कोरोना झाला आहे हे समजल्यानंतर लखनऊ आणि मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. सरकारी एजन्सी आता अशा सर्वांचा शोध घेत आहे जे कनिकाच्या संपर्कात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अशा 10 लोकांची ओळख पटवली आहे. आता या लोकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

https://www.instagram.com/p/B98tXqnFqE2/

एका इंग्रजी वृत्तानुसार, या लोकांना ट्रॅक करण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. अ‍ॅडिशनल म्युनिसिपल कमिशनर सुरेश काकणी यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे की, लंडनहून आल्यानंतर कनिका मुबंईतील 10-12 लोकांना भेटली होती. आता या लोकांना ट्रॅक करण्यासाठी स्पेशल टीम तयार करण्यात आल्या आहेत.

कनिका मुंबईतील एका रोकॉर्डिंग स्टुडिओतही गेली होती. अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली की, जेव्हा कनिका लंडनहून आली तेव्हा लंडनहून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग केली जात नव्हती.

कनिका 10 मार्च 2020 रोजी मुंबईत गेली होती. 11 मार्च रोजी ती लखनऊला गेली. इथं तिन काही पार्ट्या अटेंड केल्या. जेव्हा कनिकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव आला तेव्हा मात्र गोंधळच उडाला.