Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या भीतीनं बदलली अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ आणि रणवीरच्या 83 ची रिलीज डेट ?

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसची वाढती दहशथ पाहून बॉलिवूड इंडस्ट्रीही आता सतर्क झाली आहे. इंडस्ट्रीतही याचे इफेक्ट पहायला मिळत आहेत. अनेकांनी सिनेमांची शुटींग आणि काही दौरे रद्द केले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार काही सिनेमांनी तर आपली रिलीज डेटही बदलली जाऊ शकते. या अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ यांचा सूर्यवंशी आणि रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा सिनेमा 83 चादेखील समावेश आहे. सूर्यवंशी सिनेमा 24 मार्च 2020 तर 83 हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रिलोजी होणार आहे. परंतु आता या रिलीज डेटमध्ये बदल होणार आहे का यावर रिलायन्स एंटरटेंमेंटच्या CEOनं भाष्य केलं आहे.

रिलायन्स एंटरटेंमेंटचे CEO शिबाशिष सरकार यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “याबद्दल रोज चर्चा होत आहे परंतु अद्याप यावर काहीही निर्णय झालेला नाही. अद्याप तरी सिनेमांच्या रिलीज डेट त्याच आहेत ज्या अनाऊंस करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचा सिनेमांवर काही खास परिणाम होत नाहीये परंतु या गोष्टीकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकत नाही. लोका एका ठिकाणी जमायला किंवा गर्दीच्या ठिकाणी जायला घाबरत आहेत.”

पुढे बोलताान शिबाशिष सरकार म्हणाले, “पहिल्यांदा सूर्यवंशी सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळं जो काही निर्णय होईल तो आधी सूर्यवंशी बद्दल होईल नंतर 83 बद्दल घेतला जाईल. 83 रिलीज व्हायला अजून वेळ आहे. जरी रिलीज डेट बदलायला लागली तरी जास्त चिंता नाही. डेट बदलल्यानं खास काही फरक पडणार नाही. आम्ही आशा करतो हळूहळू सगळं नॉर्मल होईल. जेणेकरून रिलीज डेट बदलावी लागणार नाही.”