‘भाईजान’ सलमानच्या गाण्यावर ‘या’ जोडप्यानं शेतात केला ‘भन्नाट’ डान्स (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या टिकटॉकचे वेड सगळ्यांनाच खूप लागले आहे. प्रत्येकजण कोणत्यानाकोणत्या गाण्यावर आपल्या अंदाजात व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा सामान्य व्हिडिओही खूप व्हायरल होतात आणि त्यांना हजारोंनी लाईक आणि कमेंटही मिळतात. असाच एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे. ज्यांनी आपल्या अंदाजात व्हिडिओ तयार केला आहे. त्यांचा हा सोशलवर व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या गाण्यावर एका जोडप्याने व्हिडिओ तयार केला आहे. त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सलमान खान आणि भाग्यश्रीचे ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील गाणे ‘दिल दीवाना’ यावर एका जोडप्याने सलमानच्या गाण्यावर स्टेप केल्या आहेत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि जेव्हा रवीनाने तो पाहिला तेव्हा व्हिडिओला क्यूट म्हणण्यापासून ती स्वत: ला रोखवू शकली नाही.

सोशल मीडियावर या जोडप्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, यात ते दोघे ‘दिल दीवाना …’ वर नाचत आहेत. हे गाणे त्यांनी आपल्याच आपल्या अंदाजात सादर केले आहे. त्यांनी या गाण्यात सलमान आणि भाग्यश्री यांसारखे कपडे देखील परिधान केले आहे.

सलमान खानबद्दल बोलायचे म्हणले तर तो सध्या त्याच्या आगामी ‘दबंग 3’ चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो 20 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

Visit : Policenama.com