हार्दिक पंड्यानं साखरपुडा करत केलं नताशाला ‘KISS’, Ex बॉयफ्रेंडनं केली ‘अशी’ कमेंट ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पंड्यानं नवीन वर्षाची सुरुवात आपल्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा करत केली आहे. हार्दिक पंड्याचं नाव उर्वशी रौतेलापासून तर अनेक मुलींसोबत जोडलं गेलं आहे. परंतु अखेर त्यानं नताशा स्टानकोविकसोबत साखरपुडा केला आहे. नताशा आणि हार्दिकच्या साखरपुड्याचा व्हिडीओ नताशानं इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.

View this post on Instagram

Forever yes 🥰💍❤️ @hardikpandya93

A post shared by 🎀Nataša Stanković🎀 (@natasastankovic__) on

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हार्दिक पंड्या आणि नताशा समुद्रात एका बोटेत आहेत. हार्दिक नताशाला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो आणि नंतर तिच्या बोटात रिंग घालतो. या व्हिडीओत नताशा आणि हार्दिक एकमेकांना किस करतानाही दिसत आहेत. बॅकग्राऊंडला खास म्युझिकही सुरू आहे. दोघांचाही फुल फिल्मी अंदाज पहायला मिळत आहे.

View this post on Instagram

01.01.2020 ❤️

A post shared by Hardik Pandya (@hardik.pandya.club) on

खास बात अशी की नताशाच्या व्हिडीओवर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि टीव्ही अॅक्टर अली गोनी यानंही कमेंट केली आहे. त्यानं हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. नताशा आणि हार्दिक पंड्याचा हा साखरपुड्याचा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सर्वांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नताशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी यानं नताशाच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अली आणि नताशा नुकतेच डान्स रिअॅलिटी शो नच बलिएमध्ये एकत्र डान्स करताना दिसले होते. एक्स कपल म्हणून त्यांनी एन्ट्री घेतली होती.

View this post on Instagram

Love Birds ❤️👩‍❤️‍👨

A post shared by Hardik Pandya (@hardik.pandya.club) on

 

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/