अभिनव कश्यपनं सलमान खानच्या Being Human ला मनी लाँड्रींग हब’ असल्याचं सांगितलं ! अरबाज खाननं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्येनंतर आता अनेकांनी वंशवाद आणि, गटबाजीचा मुद्दा उचलून धरला आहे. काही दिवसांपूर्वीच दबंग सिनेमाचे डायरेक्टर अभिनव कश्यप यांनी पोस्ट शेअर करत समलान, सोहेल आणि अरबाज खान, पिता सलीम खान यांच्यावर करिअर बरबाद केल्याचा आरोप करत त्यांना दोषी ठरवलं होतं. यानंतर अभिनव सतत काही ना काही पोस्ट शेर करत सलमानवर निशाणा साधत आहेत. नुकतीच त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत सलमानच्या बींग ह्युमनला टारगेट केलं होतं. बींग ह्युमन मनी लाँड्रींग हब असल्याचा आरोप करत सरकारनं त्याची चौकशी करावी असंही ते म्हणाले. अरबाज खान यानंही यानंतर यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनव यांच्या आरोपांनंतर एका मुलाखतीत बोलताना अरबाज खान म्हणाला, “आम्ही त्याच्या विरोधात लीगल अ‍ॅक्शन घेतली आहे. आम्ही फिल्म असोसिएशन विरोधातही तक्रार दाखल केली आहे. आम्ही याच मार्गानं जाणार आहोत. इतर कोणत्या मार्गानं जाण्यात आम्हीला कोणताही रस नाही. यासोबत लढण्याचा हाच योग्या मार्ग आहे असं आम्हाला वाटतं.

काय होती अभिनवची पोस्ट ?

जनाब सलीम खआनी सर्वात मोठी आयडिया बींग ह्युमन फक्त एक दिखावा आहे. दबंगच्या शुटींग दरम्यान माझ्या डोळ्यासमोर 5 सायकल वाटल्या. दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये छापून आलं की, सलमान खाननं 500 सायकली गरीबांमध्ये वाटल्या. हा सगळा प्रयत्न सलमान खानची गुंडा आणि मवाली अशा प्रतिमेला सुधारण्याची आहे. याचं कारण असं की, हे सगळं पाहून याच्या अनेक क्रिमिनसल कोर्ट केसेसमध्ये मीडिया आणि जज त्याला थोडी सवलत देतील. बींग ह्युमन आज 500 रुपयांची जीन्स 5000 रुपयांमध्ये विकतं. हेही माहिती नाही की, अजून कशा कशाच्या नावावर मनी लाँड्रींग सुरू आहे. साध्या भोळ्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून नोटा गोळा करत आहेत हे धूर्त लोक. यांची मानस कोणाला काही देण्याचा नाही तर फक्त घेण्याचा आहे. सरकारनं बींग ह्युमनची खोल चौकशी करायला हवी. मी सरकारला पूर्ण सहकार्य करेन. #BoycottSalmanKhan #MeToo #Investigate #Interrogate.”