राखी सावंतच्या लग्नामुळे दिपल कलाल ‘भडकला’, ४ कोटी रूपये मागितले परत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कंट्रोवर्सी क्वीन राखी सावंत हिने लग्न केल्याच्या चर्चा माध्यमांत झळकु लागल्यानंतर अनेकांनी तिची थट्टा उडवत ट्रोल केले. तर तिच्या अनेक चाहत्यांना तिच्या लग्नाचा आनंद देखील झाला आहे. मात्र या सगळ्यात एका व्यक्तीला अतिशय राग आला असून त्याचे नाव दीपक कलाल असे आहे. मागील वर्षी राखी सावंत आणि दीपक कलाल यांनी लग्नाचे नाटक केले होते.

त्यानंतर आता राखी सावंतने लग्न केल्यानंतर तिळपापड झालेल्या दीपक कलाल याने इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ अपलोड करत यामध्ये तो राखी सावंत हि लपून छपून लग्न केल्याबद्दल खरी खोटी सुनावत आहे.  या व्हिडिओत तो राखी सावंत हिला धमकी देताना दिसून येत आहे. यामध्ये तो म्हणतो कि, तू जे हे मंगळसूत्र पाहत आहेस, जे तू संपूर्ण मीडियासमोर माझ्याकडून घालून घेतले होते. त्याचबरोबर तू हे जे काही लपून लग्न केले आहे ते बरोबर नाही. याआधी तू म्हणाली होतीस कि, मी दीपक कलाल बरोबर लग्न करणार आहे. त्याचबरोबर त्याने तिच्यावर पैसे लुटल्याचे आरोप करताना म्हटले कि, तू माझ्याकडून चार कोटी रुपये घेतले आहेत. पोते भरभरून मी तुला हे पैसे दिले आहेत. जर तू चार दिवसांत माझे पैसे मला परत दिले नाहीस तर तुझे जीवन मी अवघड बनवेल.

दरम्यान, दिपकच्या या व्हिडिओला राखी सावंतने देखील शेयर केले आहे. त्यानंतर आत राखी सावंतचे चाहते त्याच्यावर तुटून पडले असून अनेकांनी त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त