बॉलिवूडमध्येही पसरली ‘कोरोना’ व्हायरसची ‘दहशत’, दीपिका पादुकोणनं रद्द केला फ्रान्समधील ‘इव्हेंट’

बोल्ड न्युज 24 ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना व्हायरची दहशत पसरत आहे. याचा परिणाम भारतावरही झाला आहे. भारतात याची 5 प्रकरणं समोर आली आहेत. फिल्मी गल्ल्यांमध्येही याची भीती पसरताना दिसत आहे. कारण अभिनेत्री दीपिका पादुकोणनं कोरोनाच्या भीतीनं पॅरीस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्याचं शेड्युल रद्द केलं आहे.

https://www.instagram.com/p/B8xdIP2Dff4/

कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता या इव्हेंटला जाणं दीपिका पादुकोणनं कॅन्सल केलं आहे. लग्जरी फॅशन हाऊस लुई वीतोंनं पॅरीस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी दीपिकाला आमंत्रण दिलं होतं. हा इव्हेंट 3 मार्चपर्यंत चालणार होता. कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणं पाहता दीपिकानं आपला हा दौरा रद्द केला आहे.

रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोणच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे की, पॅरीसमध्ये सुरु असणाऱ्या लई वीतों फॅशन वीक 2020 या शो मध्ये सहभागी होण्यासाठी दीपिका फ्रान्सचा दौरा करणार होती. परंतु कोरोनानं आता फ्रान्समध्ये प्रवेश केला आहे. अशात तिनं आपला दौरा रद्द केला आहे. फ्रान्समधूनही कोरोनाची काही प्रकरणं समोर येताना दिसत आहेत. दोन लोकांचा या व्हायरसमुळं मृत्यू झाल्याचंही समजत आहे.