दीपिका पादुकोण विकतेय तिचे कपडे, 2 तासातंच रिकामं झालं कपाट ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण सध्या आपल्ये कपडे विकत आहे. दीपिका आता आपले आवडते ड्रेस विकणार आहे. तिच्या वेबसाईटवरून तिचे कपडे खरेदी केले जाऊ शकतात. सोशल मीडियावर पोस्ट टाकत नकुतीच तिने याबाबत घोषणा केली आहे.

दीपिका पादुकोणचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती खुलासा करत आहे की, वेबसाईटवर सेलसाठी आल्यानंतर तिचं क्लासेट 2 तासातच रिकामं झालं. दीपिकाने 10 ऑक्टोबर म्हणजेच वर्ल्ड मेंटल हेल्थ डे च्या दिवशी सेलची घोषणा केली. या कपड्यातून होणारी कमाई ती मानसिक रुग्णांच्या मदतीसाठी वापरणार आहे असे तिने सांगितले आहे. दीपिका यासाठीची एक संस्थाही चालवते. लिव्ह लव्ह लाईफ असं या संस्थेचं नाव आहे. मानसिक स्वास्थ्याशी निगडीत विषयांवर ही संस्था काम करते.

नव्या व्हिडीओत दिसत आहे की, दीपिका म्हणतेय तिला नुकतंच एका फोन कॉलवरून हे समजलं आहे की, तिचं हे क्लॉसेट अवघ्या 2 तासात रिकामं झालं आहे. लवकरच ती नवीन ड्रेस विकण्यासाठी आणणार आहे.

https://www.instagram.com/p/B3bW6msDnLx/

https://www.instagram.com/p/B3WLIgIDb8L/

https://www.instagram.com/p/B3WH-K6jZ8P/

https://www.instagram.com/p/B2kEiargZ4Z/

visit : policenama.com