Chhapaak Review : दीपिका पादुकोणचा ‘दमदार’ चित्रपट, सेलिब्रिटींनी दिला एका शब्दात ‘रिव्ह्यू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘छपाक’ उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर सेलिब्रिटींनी रिव्ह्यू देणे सुरू केले आहे. चित्रपटाचा रिव्ह्यू सेलिब्रिटींनी पाहिल्यानंतर प्रत्येकाने तिचे खूपच कौतुक केले.

https://www.instagram.com/p/B7AUujogr1Z/

अलीकडेच ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ‘छपाक’ चा एक रिव्ह्यू शेअर केला आहे. त्याने या चित्रपटाला साडेतीन स्टार देत लिहिले की, ‘ ‘छपाक’ चा एका शब्दात रिव्ह्यू ‘पॉवरफुल’… काही कथा समाजाला सांगणे गरजेचे आहे. चित्रपटात एक चांगली गोष्ट म्हणजे संवेदनशील लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन, भक्कम अभिनय… दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार यांना सलाम.’ फक्त तरण आदर्शच नाही तर रितेश देशमुख, यामी गौतम, जॅकी भगनानी, नील नितीन मुकेश, कुणाल कपूर, जेनेलिया डिसूझा यांसारख्या अनेक कलाकारांनी दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘छपाक’ चित्रपटाला सर्वांनीच ‘पॉवरफुल’ चित्रपट म्हणले आहे. त्याचबरोबर अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हरची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे.

या चित्रपटात रिअल लाइफ अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालची कथा दाखविली गेली आहे. जिने अ‍ॅसिडच्या खुल्याआम विक्रीविरूद्ध लढा दिला होता आणि आता ती सर्वांसाठी प्रेरणा बनली आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट 10 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/B54350Zg_om/

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/