Video : ग्रोसरी शॉपिंग करताना स्पॉट झाली दीपिका पादुकोण ! सोबत नव्हता पती रणवीर सिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोशलवर कायमच ॲक्टीव्ह असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत असते. कधी कधी तिचा बोल्ड किंवा ग्लॅमरस अवतारही पाहायला मिळतो. तिनं अनेकदा बोल्ड बिकिनी लुकमधील फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आपल्या एका व्हिडीओमुळं सध्या ती चर्चेत आली आहे.

दीपिकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सध्या खूप अटेंशन घेताना दिसत आहे. खास बात अशी की, दीपिका यात ग्रोसरी खरेदी करून परत येताना दिसत आहे. यावेळी तिचा पती रणवीर सिंग हा तिच्या सोबत दिसला नाही. दीपिका एकटीच ग्रोसरी खरेदी करताना स्पॉट झाली.

अलीकडेच दीपिकानं स्वत:बद्दल खुलासा केला होता की, आपली पर्सनल कामं स्टाफला सांगण्याऐवजी ती स्वत:च करते. दीपिका तिची सर्व काम स्वत:च करत असते. तिला तिची कामं स्वत:ला करायला आवडतात.

व्हिडीओत दिसत आहे की, जेव्हा दीपिका स्टोरमधून बाहेर आली तेव्हा तिच्याकडे शॉपिंग बॅगही होत्या.

दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत. शाहरुखच्या पठाण सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर हृतिक रोशन सोबत ती फायटर सिनेमातही झळकणार आहे.