दीपिकानं स्टेजवर काढली श्रीदेवीशी संबंधित ‘आठवण’, पती बोनी कपूरला ‘रडू’ कोसळलं (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बोनी कपूर यांनी रविवारी श्रीदेवीवर लिहलेलं पुस्तक ‘श्रीदेवी द एटरनल स्क्रीन गॉडेस’ लाँच केलं. यावेळी बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शिका गौरी शिंदे याही उपस्थित होत्या. यावेळी बोनी कपूर आपली पत्नी श्रीदेवीची आठवण काढत खूप इमोशनल झाल्याचे दिसले. दीपिकानं जेव्हा श्रीदेवी आणि तिच्या आठवणी शेअर केल्या तेव्हा बोनी कपूर यांना अश्रू अनावर झाले.

दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. सत्यार्थ नायक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या प्रकाशन सोहळ्यात दीपिका पादुकोण म्हणाली, “ही सायंकाळ माझ्यासाठी आंबट-गोड आहे. आम्ही श्रीदेवीला मिस करतोय. मी स्वत:ला भाग्यवान समजते की कुटुंबानं मला या कामासाठी निवडलं. जेव्हा बोनीजींनी मला पुस्तक लाँच करण्याबद्दल विचारलं तेव्हा मी केवळ यामुळे होकार नाही दिला की हे श्रीदेवीजींच पुस्तक आहे, तर यासाठी होकार दिला की, हे त्या माणसाचं पुस्तक आहे जी मला खासगी आयुष्यात खूप आवडते. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच बोनीजी आणि श्रीदेवी मॅम पहिल्या व्यक्ती आहेत ज्या माझ्या चॅम्पियन राहिल्या आहेत. 2007 पासून जेव्हा कधी माझा एखादा सिनेमा रिलीज होत होता, कोणताही उशीर न करता त्या लगेच मला पर्सनल मेसेज पाठवत होत्या जे आजही माझ्याकडे आहेत.”

दीपिका पुढे म्हणाली, “जेव्हा कधी श्रीदेवीजी आणि बोनीदी माझ्या एखाद्या सादरीकरणाचं कौतुक करत असत तेव्हा मला वाटायचं की, मला पुरस्कार मिळत आहे. बहुतेक साऊथ इंडियन कनेक्शनमुळं मी खासगी पातळीवर त्यांच्याशी खूप जोडली गेली. आमचे संबंध इतके जवळचे होते की, आम्ही घरातील स्टाफशी निगडीत विषयांवरही चर्चा करायचो.” बोनी कपूर यांच्याकडे वळून पहात दीपिका म्हणाली, “मला ही संधी देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार.” हे ऐकताच इमोशनल झालेल्या बोनी कपूर यांनी दीपिकाला अलिंगन दिलं.

यानंतर लेखक सत्यार्थ नायक यांनीही बोनी कपूर यांचे आभार मानले. यावेळी बोनी यांना अश्रू अनावर झाले त्यानंतर दीपिकानं त्यांना अलिंगन दिलं आणि धीर दिला.

श्रीदेवीचं निधन गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी 2018 मध्ये झालं होतं. कुटुंबातील एका नातेवाईकाच्या लग्नात श्रीदेवी सहभागी झाली होती. यावेळी श्रीदेवी एका हॉटेलात थांबली होती. हॉटेलच्या बाथरुममध्ये तिचा मृतदेह सापडला.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like