दीपिकानं शेअर केले Ex बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतचे ‘रोमँटीक’ फोटो ! पती रणवीर सिंगनं केली ‘अशी’ कमेंट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण हिनं काही रोमँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होत आहेत. हे फोटो दीपिका आणि पती रणवीर सिंगसोबतचे नाहीत तर एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबतचे आहे. ये जवानी है दीवानी या सिनेमावेळचे हे फोटो असून याला जवळपास 7 वर्षे झाली आहेत. खास बात अशी या फोटोंवर पती रणवीर सिंगनंही कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/CA2Bxg7j09X/?utm_source=ig_embed

दीपिकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. यात दीपिका आणि रणबीर यांचा रोमँटीक अंदाज दिसत आहे. ये जवानी है दीवानी हा सिनेमा 31 मे 2013 रोजी रिलीज झाला होता. सिनेमाला 7 वर्षे झाल्याच्या निमित्तानं तिनं हे फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमातील तिची भूमिका नैना तलवारचा एक डायलॉग वापरून तिनं कॅप्शनही लिहिलं आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1267732077090398208?s=20

रणवीर सिंगनं केली ‘अशी’ कमेंट

दीपिकानं हे फोटो शेअर केल्यानंतर लगेचच हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत येताना दिसले. खास बात अशी की, पती रणवीर सिंगनंही यावर कमेंट केली आहे. कमेंट करताना रणवीर सिंग म्हणतो- “क्युट”