दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचा कंडोमचा किस्सा तुम्हाला माहितीये का ? खूप भडकले होते ऋषी कपूर ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचा रणबीर कपूरला कंडोम गिफ्ट करण्याचा किस्सा सध्या सोशलवर चर्चेत आहे. या बातम्यांनीही सध्या जोर धरला आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, एकदा कॉफी विद करण शोमध्ये दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर आली होती. असं म्हटलं जात आहे की, सावरियां सिनेमाच्या वेळी रणबीर सोबत दीपिकाचं अफेअर होतं. दोघांनीही नातं सार्वजनिकपणे कबुल केलं होतं.

कॉफी विद करणमध्ये जेव्हा दीपिकाला रॅपिड फायरमध्ये विचारण्यात आलं की, तू रणबीर कपूरला काय गिफ्ट देशील. यावर विलंब न लावता दीपिकानं उत्तर दिलं कंडोमचं पॅकेट. यावर स्पष्टीकरण देत दीपिका म्हणाली होती की, तिला रणबीरला कंडोम यासाठी द्यायचा आहे कारण तो कंडोमचा खूप वापर करतो.

यानंतर तिला विचारलं की, रणबीरला काय सल्ला देशील. यावर दीपिकानं त्याला कंडोमची जाहिरात करण्याचा सल्ला दिला होता. या सगळ्यावर रणबीर तर काहीच बोलला नाही. पंरतु वडिल ऋषी कपूर खूप भडकले होते. ते म्हणाले होते की, “दोन्ही अभिनेत्रींनी करिअरवर लक्ष द्यायला हवं. त्यांच्या स्टेटमेंटवरून त्यांचा क्लास दिसतो.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like