मोतीचूर लाडू अन् गाजराच्या हलव्यासोबत केली ‘दीपिका-रणवीर’ची तुलना ! स्वतः अभिनेत्रीनंच शेअर केलं मीम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळं ती कायमच चर्चेत येत असते. फक्त फोटोच नाही तर तिनं तिच्यावर बनलेले मीम्सही शेअर केले आहेत. तिची आणि पती रणवीर सिंग (Ranveer Singh) याची तुलना मिठाईसोबत करण्यात आली आहे.

दीपिकानं मीम बनवणाऱ्यावर रागवण्याऐवजी त्यांचं मीम सोशलवर शेअर केलं आहे. अलीकडेच दीपिकानं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना रणवीर सोबतचा फोटो शेअर केला होता. यात दोघंही फेस्टिव्ह आउटफिटमध्ये दिसत होते. रणवीरनं सेफरॉन कलरचा तर दीपिकानं रेड कलरचा कुर्ता घातला आहे.

हा फोटो समोर आल्यानंतर कुणीतरी मीम तयार करत रणवीरच्या कुर्त्याची तुलना मोतीचूर लाडू आणि दीपिकाच्या कुर्त्याची तुलना गाजरच्या हलव्या सोबत केली. दीपिकानंदेखील हे मीम सोशलवर शेअर केलं आहे. दीपिकाचं हे मीम सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या या स्टोरीवर रिप्लाय करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहेत.