2021 च्या दिवाळीचं दीपिका पादुकोणकडून अ‍ॅडव्हान्स ‘बुकिंग’, ‘महाभारत’मध्ये द्रौपदी बनणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण राणीपासून ते राजकुमारी पर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिकेत दिसली आहे. परंतु आता ती आपल्या करिअरच्या एकदमच कठिण रोलमध्ये दिसणार आहे. महाभारत या आगामी सिनेमात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारली आहे.

या खास भूमिकेसाठी 2021 ची दीवाळी बुक करण्यात आली आहे. म्हणजेच 2021 च्या दीवाळीला खरा धमाका तर दीपिका करणार आहे. या सिनेमाची निर्मितीही दीपिकाच करणार आहे. यासाठी तिने मधु मोंटेना प्रॉडक्शन हाऊससोबत करार करण्याचाही निर्णय घेतला आहे. ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

https://www.instagram.com/p/B3q55oEDIcx/

एका मुलाखतीत दीपिका म्हणाली, “मला द्रोपदीची भूमिका मिळाल्याने खूपच आनंदी सन्मानित वाटत आहे.” दीपिकाचं म्हणणं आहे की, महाभारत हा सिनेमा द्रौपदीच्या दृष्टीकोनातून बनावा.

https://www.instagram.com/p/B3q5UeojVGB/

असे म्हटले जात आहे की, 2021 मध्ये या सिनेमातील पहिला पार्ट रिलीज होणार आहे. परंतु प्रश्न आहे की, हा पीरियॉडिक ड्रामा असलेला सिनेमा डायरेक्ट कोण करणार ? यासाठी दोन नावे समोर येताना दिसत आहेत. एक म्हणजे साऊथचे सुपरस्टार डायरेक्टर एस राजमौली आणि दुसरं नाव म्हणजे बॉलिवूडचे निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. नेमकं कोण या सिनेमांच दिग्दर्शन करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या दीपिकाची भूमिका समोर आली आहे. आणखी कोणते चेहरे या सिनेमात असतील हे काही समोर आलेलं नाही.

https://www.instagram.com/p/B3jYr1ejkuS/

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या दीपिका छपाक सिनेमात व्यस्त आहे. याशिवाय ती 83 या सिनेमात दिसणार आहे. यात ती पती रणवीर सिंगसोबत काम करणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका ती साकारणार आहे.

https://www.instagram.com/p/B3WLIgIDb8L/

https://www.instagram.com/p/B2kEfiCAWkC/

https://www.instagram.com/p/Bxh15jfgmvo/

https://www.instagram.com/p/BxLAh8sAGei/

https://www.instagram.com/p/BxK85hRgymx/

https://www.instagram.com/p/BvNGV1hAyj9/