Delhi Violence : ‘आमिर’, ‘बिग बी’ अमिताभ, ‘सचिन’सह… सर्वजण म्हणाले- ‘मै हिंदुस्तानी’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन –  देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे पूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. लोक एकमेकांना शांती ठेवण्यासाठी आवाहन करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही असेच काहीसे प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. एक जुना व्हिडीओ सध्या सोशलवर सर्क्युलेट केला जात आहे. यात बॉलिवूड स्टार्स आणि क्रिडा क्षेत्रातील काही खेळाडून महत्त्वपूर्ण अपील करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर म्हणत आहेत, धर्माच्या नावावर अनेक लोक अनेक अत्याचार करतात. आशुतोष विचारतात, कोणता देव किंवा खुदा माफ करेल ? अमिताभ बच्चन म्हणतात, एका हिंदुस्तानीवर अत्याचार म्हणजे सर्वच हिंदुस्तानींवर अत्याचार आहे.

सचिन तेंडुलकर म्हणतो, आपण सर्वजण हिंदू, मुसलमान असण्याच्या आधी इंडियन आहोत. या व्हिडीओत प्रसिद्ध पेंटर एम एफ हुसैन, तब्बू, अनुपम खेर, फरदीन खान, अक्षय खन्ना, रवीना टंडन, अभिषेक बच्चन, हरभजन सिंह, अपर्णा सेन, ममूटी, शबाना आजमी हेदेखील दिसत आहेत. शेवटी अमिताभ म्हणतात, अजिबात हा अनर्थ करू नका. आम्ही एकमेकांच्यासोबत आहोत.

याशिवाय अनेकांनी दिल्ली हिंसाचाराबद्दल ट्विट करत शांतेतचं अपील केलं आहे. कमल हासन यांनी लिहिलं आहे की, कोणताही धर्म तिरस्कार परसवत नाही. लोकच असं करतात. पूजा भटनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, जेव्हा लोक एकमेकांच्या विरोधात जातात तेव्हा सर्वच देव दु:खी होतात.