टायगर श्रॉफची बहीण कृष्णाचं Breakup ! बॉयफ्रेंड इबाननं सांगितलं कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)ची मुलगी आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडील आणि भाऊ अ‍ॅक्टर असूनही कृष्णा सिल्व्हर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अ‍ॅक्टीव आणि चर्चेत असते. सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स (Eban Hyams) याच्यासोबत ती अनेकदा रोमँटीक फोटो शेअर असते, ज्यामुळं ती कायम चर्चेचा हिस्सा बनत असते. अलीकडेच कृष्णानं तिच्या लव्ह लाइफबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. इबान आणि तिचं ब्रेकअप झाल्याचं तिनं सांगितलं होतं. परंतु याचं कारण तिनं सांगितलं नव्हतं. आता त्यांचं ब्रेकअप का झालं याचं कारण समोर आलं आहे.

इबाननं त्याच्या इंस्टावरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत त्यानं लिहिलं की, दुराव्यामुळं नात्यावर परिणाम व्हायला नाही पाहिजे. प्रेम कायमच बेफिकिर असायला हवं. इबानच्या या पोस्टमध्ये कृष्णाच्या नावाचा उल्लेख नाही. परंतु असं म्हटलं जात आहे की, दुराव्यामुळं त्यांच्या नात्यात दरी आली आणि त्यांचं ब्रेकअप झालं.

अलीकडेच कृष्णानं तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं. कृष्णानं तिच्या इंस्टा स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली होती. यात तिनं तिचं आणि इबानचं ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. इबानपासून ती वेगळं झाल्याचं तिनं म्हटलं होतं. कृष्णानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, माझा सर्व फॅन क्लब, तुम्ही सर्व खूप चांगले आहात. परंतु मला इबान सोबत एडिट केलेल्या फोटोत टॅग करणं बंद करा. आता आम्ही सोबत नाही आहोत. कृपा करून आम्हाला एकत्र जोडू नका. तुम्हा सर्वांना सांगत आहे, कारण आता हे सार्वजनिक आहे. धन्यवाद.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. कारण तिनं इबान सोबतचे सर्व फोटो सोशलवरून काढून टाकले होतं. परंतु त्यानंतर कृष्णा इबानसोबत टाईम स्पेंड करताना दिसून आली होती.

 

You might also like