सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या सिनेमातील अभिनेत्रीला ‘बलात्कार-अ‍ॅसिड’ अटॅकची धमकी, युवक ताब्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा दिल बेचारामधील अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जी हिला कोणीतरी रेप आणि अ‍ॅसिड अटॅकची धमकी दिली आहे. अभिनेत्रीनं सोशलवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. यात तिनं तिला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे.

स्वास्तिकानं पोस्टमध्ये लिहिलं की, सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर 26 जून रोजी एका मीडिया रिपोर्टमध्ये माझं नाव घेऊन खोटा दावा करण्यात आला की, मी सुशांतच्या सुसाईडला फॅशन म्हणाले. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. रेप, अॅसिड अटॅक, आणि जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. कोलकात्याचा शुवम चक्रवर्ती यानं ही फेक न्यूज पसरवली आहे. हा एका मीडिया संस्थेसोबत काम करतो. कोलकाता पोलिसांनी या माणसाला अटक केली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीचाही शोध घेतला आहे ज्याने ठार मारण्याची धमकी दिली आहे.”

स्वास्तिकानं धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दलही सांगितलं आहे. स्वास्तिकानं लिहिलं की, “हुगलीचा रहिवासी कौशिक दास यानं मला रेप आणि अॅसिड अटॅकची धमकी दिली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.” पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल अभिनेत्रींनं त्यांचे आभार मानले आहेत.