Birthday SPL : 98 वर्षांचे झाले दिलीप कुमार ! सायरा बानो म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आज (शुक्रवार दि 11 डिसेंबर) त्यांचा 98 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिग्गज अदाकारा आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो (Saira Banu) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, चाहत्यांचं एवढं प्रेम आणि कौतुक पाहून दिलीप कुमार भारावून गेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, चाहत्यांचं प्रेम हे एखाद्या अवॉर्डपेक्षाही मोठं आहे.

सदाबहार अभिनेते दिलीप कुमार आता 98 वर्षांचे झाले आहेत. त्यांचे चाहते आणि मित्र त्यांना निरोगी आयुष्यासाठी दरवर्षी शुभेच्छा देत असतात. आता त्यांची पत्नी सायरा बानो म्हणतात, यावर्षी दिलीप कुमार यांचा वाढदिवस साजरा करण्याचा कोणताही प्लॅन नाही.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1331894596717015040?s=20

पुढं बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही अद्यापही ऐहसान आणि असलम भाई यांच्या निधनाच्या दु:खातून सावरलेलो नाही. दिलीप साहेबांनी त्यांच्या वाढदिवशी काही प्लॅन बनवलेला नाही. जेव्हा ते कोणी पाठवलेले फूल पाहतात तेव्हा त्यांना आठवतं की, आज त्यांचा वाढदिवस आाहे.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1248563673519407105?s=20

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, सध्या दिलीप कुमार खूप अशक्त आहेत. त्यांची इम्युनिटी खूप कमी झाली आहे. अनकेदा ते हॉल पर्यंत येतातही आणि पुन्हा रूममध्ये जातात. त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करा असंही त्यांनी सांगितलं होतं.