Disha Patani च्या बॉडीगार्डनं केलं कॅमेरामॅनशी ‘गैरवर्तन’, मॅनेजरच्या ‘माफी’नंतर दिशा मान खाली घालून निघाली (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी पैपराजी नेहमीच त्यांना फॉलो करत असतात. मग ते चित्रपटाची शुटिंग असो किंवा मग शॉपिंग किंवा प्रोग्रॅम असो. पैपराजी नेहमीच त्यांना फॉलो करत असतात. असे केल्यामुळे कधी कधी त्यांना स्टार्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या रागाचा सामना देखील करावा लागतो. असेच काही एका कॅमेरामॅनसोबत घडले आहे. कॅमेऱ्यामॅनला अभिनेत्री दिशा पाटनीच्या बॉडीगार्डच्या रागाचा सामना करावा लागला आहे. बोलता बोलता ही गोष्ट एवढी वाढली की हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहचले. काहीवेळानंतर हे प्रकरण शांत झाल्यानंतर अभिनेत्रीच्या मॅनेजरने त्याची माफी देखील मागितली आहे. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दिशा एका ठिकाणाहून बाहेर येत आहे आणि तिचा बॉडीगार्ड तिच्या पुढे चालत आहे, त्यादरम्यान एक कॅमेरामन दिशाच्या कारकडे येतो आणि तिचा फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून बॉडीगार्ड रागवतो आणि त्या कॅमेरामनला मागे घेतो. दरम्यान, हे पाहून देखील दिशा काही बोलताना दिसत नाही. कॅमेरामॅन आणि बॉडीगार्ड यांच्याच बरेच वाद होताना दिसत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर दिशाच्या मॅनेजरने त्याची माफी मागितली आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.

View this post on Instagram

🌹

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर दिशाचा नुकताच ‘मलंग’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 55 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात दिशाबरोबर अर्जुन कपूर आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तिच्या हॉट फोटोंमुळे दिशाही खूप चर्चेत आहे. दिशा इन्स्टाग्रामवर एकापेक्षा जास्त फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर दिशाचे 31 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांचे हजारोपेक्षा जास्त लाइक्स आणि कमेंट असतात.

View this post on Instagram

🐥

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

 

 

You might also like