Video : Disha Patani ने शेयर केला वर्कआऊट व्हिडिओ, पाहून स्तब्ध झाले फॅन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस दिशा पटानी सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असते आणि नेहमी आपल्या हॉट अदांनी फॅन्सला घायाळ करत असते. सोशल मीडियावर आपल्या बोल्ड शैलीत छायाचित्रांसह वर्कआऊट व्हिडिओसाठी सुद्धा चर्चेत असते. दिशा बॉलीवुडच्या त्या अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक आहे, ज्या आपल्या फिटनेसची खुप काळजी घेतात. तिने नुकताच सोशल मीडियावर आपला एक फिटनेस व्हिडिओ शेयर केला आहे, जो पाहून फॅन्स स्तब्ध होत आहेत.

दिशा पटानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला वर्कआऊट व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बॅक एक्सरसाइज करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती जिममध्ये घाम गाळत बॅकसाठी पुल डाऊन एक्सरसाइज करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिशाची परफेक्ट बॅक पाहून लोक कौतूक करत आहेत. लोक तिच्या टोंड बॉडीची सुद्धा खुप कौतूक करत आहेत.

दिशाचा व्हिडिओ खुप पसंत केला जात आहे. या व्हिडिओवर अ‍ॅक्ट्रेस कियारा आडवाणीने सुद्धा कमेंट केली आहे. तिने आगीचा इमोजी बनवला आहे. याशिवाय फॅन्स दिशाचे कौतूक करताना थकत नसल्याचे दिसत आहे. दिशा आणि कियाराने फिल्म एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरीमध्ये सोबत काम केले होते. या फिल्ममध्ये बॉलीवुडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने लीड रोल प्ले केला होता.

मागील काही दिवसात दिशा पटानी आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत होती. ती रूमर्ड बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मालदीवला गेली होती. जेथून तिने आपली बोल्ड छायाचित्रे शेयर केली होती. यापूर्वी दोघे सोबतच मालदीवला पोहचले होते.

वर्क फ्रंटबाबत बोलायचे तर दिशा ’राधेः यु आर मोस्ट वॉन्टेड भाई’ मध्ये सलमान खान सोबत दिसणार आहे. चित्रपटात जॅकी श्रॉफ सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.