‘बोल्ड’ बिकिनी घालून माशांच्या घोळक्यात खोल समुद्रात पोहताना दिसली दिशा पाटनी ! म्हणाली – ‘काही मित्र बनवतेय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडिओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते, तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटाेशूट. अलीकडेच तिनं मालदीवमधील काही लेटेस्ट फोटो सोशलवर शेअर केले होते. ज्यामुळं ती चर्चेत आली होती. आता पुन्हा व्हिडिओमुळं तिनं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिशानं तिच्या इंस्टारून काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यात दिशा प्रचंड हॉट दिसत आहे. दिशानं बोल्ड बिकिनी घातली आहे. खास बात अशी की, दिशा यात खोल समुद्रात पोहताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला खूप सारे मासेही दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये दिशा म्हणते, काही मित्र बनवत आहे.

दिशाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिशाच्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काही तासांतच हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे. याशिवाय ती एकता कपूरच्या केटीना या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.