‘त्या’ घटनेमुळे ६ महिने झाली होती Memory Loss, दिशा पाटनीचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या चित्रपटांसोबत आपल्या फिटनेस आणि डान्सला घेऊन खूप चर्चेमध्ये असते. दिशाला डान्स आणि फिटनेससाठी खूप मेहनत आणि ट्रेनिंग ही घ्यावी लागते. एकदा हीच ट्रेनिंग तिच्यासाठी खूप महाग पडली होती. ती या ट्रेनिंगमुळे गंभीर जखमी देखील झाली होती. यामध्ये तिची स्मृती गेली होती. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने स्वतः या गोष्टींचा खुलासा केला होता. एकदा ट्रेनिंगच्या वेळी ती खूप जोरात पडली होती. यामुळे तिच्या डोक्याला मार लागल्याने तिची स्मृती गेली होती.

ती या घटनेविषयी सविस्तर सांगताना म्हणाली की, ‘एकदा ती ट्रेनिंग करताना डोक्यावर पडली होती. त्यावेळी तिच्या डोक्याला खूप मार लागला होता. हा मार इतका गंभीर होता की, तिने ६ महिने आपली स्मृती गमावली होती. दिशाने सांगितले की, मी ६ महिन्यासाठी आपले जीवन गमावले होते.’ दिशाने पहिल्यांदा याबद्दल सविस्तर सांगितले.

या व्यतिरिक्त ती अनेकदा जखमी झाली आहे. नुकताच तिचा प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्या गुडघ्याला लागले होते. दिशा पाटनीने हे ही सांगितले की, तिला जिमनास्टिक आणि मार्शल आर्ट खूप पसंत आहे. तिने सांगितले की, ‘मी जेव्हा चित्रपटाची शूटिंग करत नव्हते तेव्हा जिमनास्टिक आणि मिक्स मार्शल आर्टसाठी प्रॅक्टिस करायचे. मिक्स मार्शल आर्ट जास्त कठीण नव्हता जेवढा लोक समजत होते.’

दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने दिशा पाटनीसोबत रोमॅन्टिक चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. सध्या कार्तिक आर्यन ‘भुल भुलैया 2’ लक्ष केंद्रित करत आहे. दिशा पाटनी मोहित सूरी यांचा चित्रपट ‘मलंग’ मध्ये काम करत आहे. या चित्रपटामध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमू सारखे कलाकार दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –