Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी ‘दिशा सॅलियन’नं 45 मिनिट फोनवर केली होती चर्चा, ‘या’ गोष्टींचा केला होता ‘उल्लेख’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूबरोबरच आता त्यांची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनचे प्रकरण देखील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लोक आता सुशांत आणि दिशाचे प्रकरण एकमेकांशी जोडताना दिसत आहेत. चाहते आणि काही काही स्टार्स लोकांचा असा विश्वास आहे की या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी काहीना काही संबंध आहे. मात्र दिशाच्या वडिलांनी सुशांतच्या प्रकरणात मुलीच्या नावावर आक्षेप घेतला आहे. सुशांत आणि दिशाच्या आत्महत्या प्रकरणात प्रत्येक क्षणाला एक नवीन आणि आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनीही दिशाच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा केला आहे.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत्यू होण्यापूर्वी दिशा सॅलियनने कुणाशी तरी फोनवर दीर्घ चर्चा केली. मृत्यूपूर्वी दिशाने एका मित्राशी सुमारे 45 मिनिटे फोनवर चर्चा केली होती. 45 मिनिटांच्या या संभाषणामध्ये आपल्या व्यावसायिक जीवनातील गोष्टी तिने शेअर केल्या होत्या. हे देखील सांगितले होते की कशा प्रकारे काही डील्स देखील तिच्याकडून कन्फर्म होऊ शकत नव्हत्या.

दिशा सॅलियनचे 8 जून रोजी मुंबईतील एका इमारतीवरून पडल्यामुळे निधन झाले. त्याच वेळी, मृत्यूच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 9 जून रोजी, दिशाचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला. 11 जून रोजी दिशाची कोविड टेस्ट झाली होती, ती निगेटिव्ह होती आणि त्यानंतरच दिशाचे शवविच्छेदन केले गेले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like