Disha Salian प्रकरणात नवीन खुलासा ! प्रकरणात ‘या’ गोष्टींकडे झाले दुर्लक्ष, फॉरेन्सिक तज्ञांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबरच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणातही बरेच नवीन खुलासे होत आहेत. दिशा सालियानचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. चाहते अगोदर दिशाच्या आत्महत्या प्रकरणाला सामान्य प्रकरण मानत होते. त्याचवेळी या आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण आले आहे. वृत्तानुसार, दिशाचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आहे, ज्यावरून मृत्यूच्या दोन दिवसानंतर शवविच्छेदन केल्याचे समजते. तर फॉरेन्सिक तज्ञांनी यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिशा सालियानच्या शवविच्छेदनाबाबत बोलताना फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ दिनेश राव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि अशा बर्‍याच गोष्टी सांगितल्या ज्या खरोखरच आश्चर्यकारक आहेत. फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणतात, ‘दिशाच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर शवविच्छेदन करणे पोलिसांचा मोठा बेजबाबदारपणा आहे आणि त्यांनी उत्तर दिले पाहिजे.’

तसेच फॉरेन्सिक एक्सपर्ट दिनेश यांनी हेही सांगितले की, ‘लैंगिक अत्याचाराचे संकेत आहेत, त्यामुळे त्यांनी जैविक नमुने गोळा केले आहेत. तर कापड सामग्री आणि नेल स्क्रॅपिंगकडे दुर्लक्ष केले आहे, जे आवश्यक असते.’

त्यासोबतच मुंबई पोलिसांच्या हाती दिशा सालियानची आणखी एक महत्त्वाची माहिती लागली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू होण्यापूर्वी दिशा सालियान सुमारे ४५ मिनिटे फोनवर आपल्या एका जवळच्या मित्राशी बोलली होती. या ४५ मिनिटांच्या संभाषणांमध्ये तिने आपल्या व्यावसायिक जीवनाबद्दल गोष्टी शेअर केल्या होत्या. तिच्याकडून काही डील्सही कन्फर्म होऊ शकत नव्हत्या हे देखील सांगितले होते.