Madam Chief Minister च्या पोस्टरवरून वाद ! ऋचा चड्ढानं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadda) चा आगामी सिनेमा मॅडम चीफ मिनिस्टर (Madam Chief Minister) च्या पोस्टरवरून वाद झाला होता. आत ऋचानं यावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे आणि याला नकळत झालेली चूक म्हटलं आहे.

ऋचाच्या आगामी सिनेमाचं पोस्टर हे 5 जानेवारी रोजी रिलीज करण्यात आलं होतं. यानंतर दलित समाजाला रूढीवादी दाखवल्यानं अनेकांनी यावर टीका केली होती. पोस्टरमध्ये ऋचा हातात झाडू घेऊन दिसली होती. तिथंच अनटचेबल, अनस्टॉपेबल लिहिलं होतं.

https://www.instagram.com/p/CKDOjYeD42x/?utm_source=ig_embed

काहींनी अनटचेबल (अस्पृश्य) शब्दावर आक्षेप घेतला होता. ऋचा म्हणाली की, सिनेमात काम करताना ती खूप काही शिकली आहे. एका स्टेटमेंटमध्ये ऋचानं सांगितलं की, सिनेमाच्या पहिल्या पोस्टरवर खूप टीका झाली. तेही योग्य कारणांमुळं. माझ्यासाठी ते फक्त पात्रानं वापरलेलं सामान होतं, जे अनेक लोकांना दलित समुदायाला घेऊन पुराणमतवादी धारणा प्रतिबिंबित करणारं वाटलं.

https://www.instagram.com/p/CKDj7lpD2O0/?utm_source=ig_embed

ऋचानं सांगितलं की, लगेचच चुकीची जाणीव झाली आणि दुसऱ्या दिवशी एक नवीन पोस्टर जारी करण्यात आलं. ही खेदजनक आणि नकळत झालेली चूक होती. कोणीही जाणूनबुजून असं केलं नव्हतं. आम्ही माफी मागतो.

https://www.instagram.com/p/CJnJPvPjUGS/

ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आता लवकरच ती मॅडम चीफ मिनिस्टर या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती आर्टीकल 375 सिनेमात दिसली होती. याशिवाय तिनं डायरेक्टर अय्यर तिवारी यांचा स्पोर्ट ड्रामा सिनेमा पंगा मध्येही काम केलं आहे. तिचा शकीला हा सिनेमा 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे. 2008 मध्ये आलेल्या ओए लक्की, लक्की ओए या सिनेमातून ऋचानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. ऋचानं गँग्स ऑफ वासेपूर च्या सीरिजमध्ये काम केलं आहे.