Video : महिला डॉक्टरनं चक्क PPE किट घालून नोरा फतेहीच्या ‘हाय गर्मी’वर केला ‘भन्नाट’ डान्स, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. मेडिकल स्टाफसह अनेक क्षेत्रातील लोक आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करत आहेत. या कठिण काळात प्रत्येकजण त्रस्त आहे, परंतु सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्ही तुमच्या सर्व समस्या विसरून जाल आणि चेहर्‍यावर हास्य उमटेल.

डॉक्टर्स हॉस्टिटल्समध्ये अनेक तास पीपीई किट घालून रूग्णांची सेाव करत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, परंतु या संकटाच्या स्थितीत सुद्धा त्यांनी हार मानलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हाच संदेश देत आहे.

या व्हिडिओत एक महिला डॉक्टर पीपीई किटमध्ये नोरा फतेहीचे गाणे ’गर्मी’ वर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे, आम्ही सर्व या कठिण काळात आणि इतक्या गर्मीत सुद्धा रूग्णांची सेवा करतानाही कधीही निगेटिव्हिटी येऊ देत नाही. काय मस्त आऊटफिट आहे.

सर्वांनाच माहिती आहे की, पीपीई किट अनेक तास घालून काम करणे खुप अवघड आहे. यामध्ये केवळ गरमच होत नाही तर, चेहर्‍यावर घट्ट डबल मास्क लावल्याने रॅशेज पडतात. तरीही डॉक्टर्समध्ये देशाची सेवा करण्याचा उत्साह कमी होताना दिसत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like