‘रामायण’नंतर आता दूरदर्शनवरील ‘ही’ मालिका बनली नंबर – 1 ! ‘हे’ आहेत टॉप-5 शो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  प्रत्येक आठवड्यात जारी केल्या जाणाऱ्या टीआरपी लिस्ट रिपोर्टच्या 20 व्या आठवड्यातील रिपोर्टही प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात दूरदर्शनवरील मालिकेनं प्रथम स्थान प्राप्त केलं आहे. रामायण नंतर सुरू झालेल्या श्रीकृष्णा मालिकेनं टीआरपी लिस्टमध्ये पहिला नंबर मिळवला आहे. 19 व्या आठवड्यातीस TRP लिस्टमध्ये ही मालिका दुसऱ्या नंबरवर होती. परंतु आता हा शो टॉपवर आहे.

‘ही’ आहे यादी

टॉप शोच्या लिस्टबद्दल बोलायचं झालं तर ओवरऑल कॅटेगरीत डीडी नॅशनलवरील श्रीकृष्णा ही मालिका सर्वात वर आहे. या मालिकेनं 21453 इम्प्रेशनसह पहिलं स्थान मिळवलं आहे. यानंतर दंगलवर प्रसारीत केला जाणारा कार्यक्रम बाबा ऐसो वर ढूंढो दुसऱ्या नंबरवर आहे. या शोनं 17089 इम्प्रेशन मिळवले आहेत. तिसऱ्या नंबरवर दंगलवरील महिमा शनिदेव की आहे. तर चौथ्या स्थानावर स्टार प्लसवर प्रसारीत होणारा शो महाभारत आहे. दंगलवरील रामायण 5 व्या नंबरवर आहे.

ग्रामीण भागाबद्दल बोलायचं झालं तर इथं दंगलचाच बोलबाला आहे. टॉप 5 मध्येच दंगलवरील 4 कार्यक्रम आहेत. बाबा ऐसो वर ढूंढो पहिल्या तर महिमा शनिदेव की दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या नंबरवर श्रीकृष्णा आणि चौथ्या व पाचव्या स्थानावर रामायण आणि रक्त संबंध आहेत.

शहरी भागात पहिल्या नंबरवर डीडी नॅशनलवरील श्रीकृष्णा, दुसऱ्या नंबरवर स्टार प्लसवरील महाभारत तर तिसऱ्या नंबरवर डीडी भारतीवरील विष्णु पुराण, चौथ्या नंबरवर स्टार प्लसवरील देवों के देव महादेव आहे. तर पाचव्या नंबरवर दंगलचा बाबा ऐसो वर ढूंढो आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like