आयुष्मान खुरानासोबत काम करणारा ‘हा’ अभिनेता प्रचंड आर्थिक अडचणीत ! पोट भरण्यासाठी फळे विकण्यास ‘मजबूर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   लॉकडाऊनमुळं सर्वांनाच प्रचंड आर्थिक तंगीला सामोरं जावं लागत आहे. आयुष्मान खुरानासोबत काम केलेला अभिनेताही प्रचंड अडचणीत आला आहे. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो राजधानी दिल्लीत फळ विकण्यासाठी मजबूर झाला आहे.

बॉलिवूड अॅक्टर आयुष्मानसोबत काम करणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे सोलंकी दिवाकर. सोलंकीनं ड्रीम गर्ल आणि सोनचिडीया सिनेमात काम केलं आहे. जरी त्याला लोक जास्त ओळखत नसले तरी लॉकडाऊनमुळं दिवाकरची खूप अचडण झाली आहे. त्यानं फळं विकण्यास सुरुवात केली आहे.

एका मुलाखतीत दिवाकरनं सांगितलं की, लॉकडाऊनमध्ये मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. मला घरभाडं द्यायचं आहे. कुटुंबाच्या गरजा आहेत. म्हणून मी फळं विकायला सुरुवात केली.

दिवाकरनं सांगितलं की, सध्या सर्व शुटींग बंद आहेत. तो आगामी सिनेमात ऋषी कपूरसोबत एक लहान रोल करणार होता. आज ऋषी कपूर या जगात नाहीत आणि शुटींगही बंद आहे. त्यांच्यासोबत काम न केल्याचं दु:ख कायमच सलत राहिलं असही तो म्हणाला. आग्र्याचा रहिवासी दिवाकर गेल्या 25 वर्षांपासू दिल्लीत रहात आहे.