दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्जच्या जाळ्यात आणखी एक मोठी अभिनेत्री, NCB ला मिळाले पुरावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पादुकोणनंतर आता बॉलिवूडची आणखी एक मोठी अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आहे. जवळपास ४० वर्षांच्या या अभिनेत्रीने एकाहून एक मोठे हिट चित्रपट दिले आहेत.

ही अभिनेत्री २००५, २००६ च्या काळातील आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या ड्रग्स पॅडलर्स अनुज केशवानी आणि अंकुशची चौकशी केल्यानंतर या अभिनेत्रीचे नाव समोर आले. या अभिनेत्रीची मॅनेजर ड्रग्जची खेप या अभिनेत्रींकडे पाठवत असे. या अभिनेत्रीची मॅनेजर ड्रग्स पॅडलर अनुजची मैत्रीणही होती.

अशीच एनसीबी चौकशी करावी लागेल
२०१९ मध्ये या अभिनेत्रीसाठी खरेदी केलेल्या ड्रग्जची माहिती आणि पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॅनेजरने ड्रग्ज पॅडलर्सशी एक ते दोन वेळा मीटिंगही केली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत पहिल्या अभिनेत्रीच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. आणि यानंतर या अभिनेत्रीला देखील एनसीबी चौकशीला सामोरे जावे लागू शकते.

एनसीबीच्या या तपासात जया साहाची मॅनेजर करिश्मासोबत दीपिका पदुकोणच्या गप्पांचे चॅट्स समोर आले आहेत. जया साहा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचे चॅट्स देखील समोर आले आहेत, ज्यात श्रद्धा जयाकडून सीबीडी ऑइल मागत आहे. चॅट्सच्या वेळी काही इंग्रजी अक्षरे कोड म्हणून वापरली जात असल्याचे तपासात आढळले. कोड्सनुसार, डी एन एस के (डी म्हणजे दीपिका पादुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि के म्हणजे करिश्मा प्रकाश) आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like