‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे एनसीबीकडून अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिची आज चौकशी केली जाणार आहे. ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीतसह बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्रींची नावंदेखील उघड झाली आहेत. त्यामुळेच एनसीबीने रकुल प्रीत, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.

अमली पदार्थ विरोधी पथकाने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. मात्र एनसीबीचे समन्स मिळाले नसल्याचे रकुलने सांगितले होते. एनसीबीने यावर भाष्य करत रकुलला समन्स मिळाल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आज रकुलची चौकशी होणार आहे. रकुलसोबतच दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिचीदेखील चौकशी होणार आहे.

तर दीपिकाची उद्या चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like