Sushant Case : सुशांत केसमधील सर्वांत मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा खुलासा ! NCB च्या छापेमारीत आढळले 5 किलो ड्रग्ज

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर या ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ला आता मोठं यश मिळालं आहे. बुधवारी (9 डिसेंबर) एनसीबीनं मुंबईच्या अंधेरी भागात छापेमारी केली. यात मोठा ड्रग्स पेडलर रीगल महाकाल याला अटक केली आहे. एनसीबीला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि कॅश सापडली आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितलं की, छापेमारीत 5 किलो मनाला क्रीम नावाचं ड्रग्ज सापडलं आहे. मनाला क्रीम ड्रग्ज नशा करणाऱ्या परदेशी लोकांची पहिली पसंती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 2.50 कोटी रुपये सांगितली जात आहे.

रिया चक्रवर्तीला डायरेक्ट ड्रग्ज सप्लाय केल्याचा दावा

याशिवाय 13 लाख रुपयेदेखील मिळाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पेडलर रीगल महाकाल अनुज केशवानीला ड्रग्ज सप्लाय करत होता आणि केशवानीनं रिया चक्रवर्तीला सप्लाय केला होता. दावा केला जात आहे की, रीगल महाकाल यानं रियाला डायरेक्ट सप्लायदेखील केला आहे. एनसीबीची टीम सध्या आजम खान नावाच्या ड्रग्ज सप्लायरच्या घरी छापेमारी करत आहे.