Video : ‘कोरोना’मुळं वर्क फ्रॉम होम करतोय ‘किंग खान’, शुटींगचा व्हिडीओ झाला व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या तीन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन लागू होता. सर्वकाही ठप्प झालं होतं. आता हळूहळू सारं काही अनलॉक होत आहे. यामुळंच सिनेमाची शुटींगही केली जात आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सांगत आहे की, शाहरुखदेखील वर्क फ्रॉम होम करत आहे. समोर आलेल्या व्हिडीओत शाहरुख खान घरातल्या बाल्कनीत शुटींग करताना दिसत आहे.

शाहरुख खानच्या काही फॅन पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, शाहरुख खान त्याचा बंगला मन्नतच्या बाल्कनीत काही शुट करत आहे. व्हिडीओत शाहरुख खान सोबतच कॅमरे आणि लाईट्सही दिसत आहेत. यावेळी बाल्कनीत स्पॉट झाल्यानंतर शाहरुखनं फोटोग्राफर्स आणि मीडियाला पोजही दिल्या.

https://www.instagram.com/p/CB5uLc_hqFR/?utm_source=ig_embed

शाहरुख खानचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. कामाप्रति त्याचं समर्पण चाहत्यांनाही खूप आवडलं आहे. ही शुटींग नेमकी कशाची होती याबद्दलही अनेकांनी त्याला प्रश्न केले आहेत. शाहरुख नेमकी कशाची शुटींग करत होता हे तर आता येणारी वेळच सांगेल.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.