अभिनेता सोनू सूदला निवडणूक आयोगानं बनवलं पंजाबचा राज्य ‘आयकॉन’ !

पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगानं बॉलिवूड स्टार सोनू सूद याला पंजाबचा राज्य आयकॉन म्हणून नुयक्त केलं आहे. एका स्टेटमेंटमध्ये पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस. करुणा राजू यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे की, कार्यालयानं भारतीय निवडणूक आयोगाला (Election Commission of India) या संदर्भात एक प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव त्यांनी मंजूरही केला आहे.

कोरोना व्हायरस लॉकडाउनमध्ये (COVID-19 pandemic Lockdown) सतत लोकांची मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अजूनही चर्चेत आहे. या सकंटकाळात अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांची तो सतत मदत करताना दिसला होता. पडद्यावरील हा खलनायक रिअल लाईफ सुपरहिरो ठरताना दिसला. अनेक गरिबांना, बेरोजगारांना, विद्यार्थ्यांनाही त्यानं मदत केली.

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रहिवासी सोनू सूदनं लॉकडाउन काळात लोकांची मदत करण्यास सुरुवात केली तेव्हा पूर्ण देश त्याला ओळखायला लागला होता.

सोनूंनं कोरोना काळात फक्त गरिबांचीच नाही तर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांनाही मोलाची मदत केली आहे. त्यांना पीपीई किट देणं किंवा राहण्यासाठी हॉटेल देणं अशी अनेक प्रकारची मदत त्यानं केली आहे.

सोनू सूद याचं एक नवं पुस्तक लवकरच प्रेक्षकांच्या आणि वाचकांच्या भेटीला येणार आहे. आय अ‍ॅम नो मसिहा (I am No Messiah) असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक येत्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यानं कोरोना काळात आलेले अनुभव सांगितले आहेत.