…म्हणून गरिबांची अँजेलिना जोली म्हटल्यानं भडकली ईशा गुप्ता !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील बोल्ड अभनेत्री ईशा गुप्ता हिनं खासगी आयुष्याबद्दल इंस्टाग्रामवरून खूप खास असा एक खुलासा केला होता ज्यामुळं ती सध्या चर्चेत आली होती. ईशानं स्पॅनिश बिजनेसमन आणि तिचा बॉयफ्रेंड मॅन्युअल कंपोस ग्वालर (Manuel Campo Guallar)सोबत नात्यात असल्याचं कंफर्म केलं होतं. यानंतर पु्न्हा एकदा ईशा चर्चेत आली आहे याचं कारण म्हणजे तिची तुलना बॉलिवूड स्टार अँजेलिना जोली सोबत केली आहे ज्यामुळं ती संतापली आहे.

अलीकडेच ईशाला गरीबांची अँजेलिना जोली म्हटल्यानं ती खूप संतापली. एका मुलाखतीत बोलताना ईशा म्हणाली, “जेव्हा लोक मला गरीबांची अँजेलिना जोली म्हणायचे तेव्हा ही गोष्ट जास्त परेशान करायची की, लोक स्वत:लाच गरीब म्हणत आहेत. आणि मी असंच दिसावं असं कधीच बोलले नाही. तुम्हीच मला असं बोलत आहात. मी माझ्या आई वडिलांमुळं अशी दिसत आहे.

ईशानं असंही सांगितलं की, कधी कधी तिला तिच्यात आणि अँजेलिना जोलीमध्ये साम्य वाटतं. जेव्हा लोक दोघींचं कोलाज करून इंटरनेटवर टाकतात तेव्हा तिला असं जाणवतं असं ती सांगते. इतकंच नाही तर ती सांगते ती तिच्या आईसारखी दिसते.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.

You might also like