ईशा गुप्ताचा ‘बाथटब’ व्हिडीओ झाला व्हायरल, चाहते म्हणाले – ‘हाय गर्मी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता या दिवसांत कदाचित चित्रपटांपासून दूर असेल, पण सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंमुळे ती सोशल मीडियावर चाहत्यांना भुरळ घालत आहे. आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीने तिच्या बाथटबचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांच्या खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये ईशाची बोल्ड अदा चाहत्यांची मने जिंकत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ईशाने ‘#Teaser’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

वास्तविक पाहता हा व्हिडिओ शूटिंग दरम्यानचा आहे, ज्यामध्ये ईशा बाथटबमध्ये पोज देत आहे. या व्हिडिओमध्ये ईशा बाथटबमध्ये झोपलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रथम ईशा पाण्यामध्ये झोपलेली दिसत आहे, त्यानंतर ती पाण्यातून बाहेर येऊन पोज देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे की तुम्ही तिच्यावर खिळलेली तुमची नजर हटवुच शकत नाही.

https://www.instagram.com/p/B907dYypv8A/?utm_source=ig_embed

ईशा गुप्ताचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे, फार कमी वेळातच लाखो लोकांनी तो पाहिला आहे. तिच्या या व्हिडिओवर कॉमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘यह काफी खूबसूरत है और मुश्किल भी.’ त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने ईशाच्या या व्हिडिओवर लिहिले की, ‘गर्मी बहुत है. गर्मी, ईशा गुप्ता.’ ईशाच्या या बाथटब व्हिडिओवर तिचे चाहते लागोपाठ प्रतिक्रिया देत आहेत आणि तिचे कौतुक देखील करत आहेत.

ईशा गुप्ताने वर्ष २०१२ मध्ये ‘जन्नत २’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, यामध्ये इमरान हाश्मी तिच्यासोबत दिसला होता. त्यांनतर ईशा गुप्ता ही ‘वन डे: जस्टिस डिलिव्हर्ड’ या तिच्या अखेरच्या चित्रपटात दिसली होती, त्यात अनुपम खेर तिच्यासोबत दिसले होते.