‘सिंगर’ रिहानानं दिलं शेतकऱ्यांना समर्थन ! कंगना राणावत, स्वरा भास्कर सहित ‘या’ बॉलिवूड सेलेब्सनं दिल्या प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, ॲक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या टीकेची धनी बनताना दिसत आहे. तिनं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर टीका केली जात आहे. काहींनी तिला पाठींबाही दिला आहे. आज आपण बॉलिवूडमधील अशा काही सेलेब्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी रिहानाच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली होती रिहाना ?
रिहानानं ट्विटरवर एक न्यूज शेअर करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला. यात शेतकरी आंदोलनामुळं बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात हरियाणातील अनेक जिल्ह्यात यामुळं इंटरनेट सेवा कशा प्रकारे बंद करण्यात आली हेही सांगितलं आहे. या न्यूजसोबत तिंन कॅप्शनमध्ये लिहिलं की, आपण यासंदर्भात चर्चा का नाही करत आहोत.

रिहानानं केलेल्या ट्विटला उत्तर देताना कंगनानं लिहिलं की, यासंदर्भात यामुळं चर्चा होत नाहीये, कारण हा शेतकरी नाही, तर दहशतवादी आहे. यांची भारत तोडण्याची इच्छा आहे, म्हणजेच चीनसारखे देश आपल्या राष्ट्रावर कब्जा करती आण युएसए सारखी चायनीज कॉलनी तयार करतील. तू शांत रहा मुर्ख. आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाहीत की, आपल्या देशाला विकू.

पंजाबी सिंगर आणि बॉलिवूड ॲक्टर दिलजीत दोसांझ यानं रिहानाचं समर्थन केलं आहे. त्यानं फक्त रिहानाचा फोटो इंस्टा स्टोरीला शेअर केला आहे आणि आनंद व्यक्त केला आहे. त्यानं यासोबत रिहानाचं हिट गाणं रन दिस टाऊन शेअर केलं आहे.

बॉलिवूड सिंगर सोना मोहापात्रा हिनं रिहानाच्या ट्विटला विरोध करत लिहिलं की, मला शंका आहे की, रिहानानं लोकांच्या विरोध आणि संदर्भांना वाचलं किंवा इतर गोष्टींना चांगलं समजून घेतलं आहे ज्या गरजेचा आहेत.

प्रोड्युसर, डायरेक्टर हंसल मेहतानं रिहानाच्या ट्विटचं समर्थन केलं आहे. स्वरानंही रिहानाच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. आणखीही काही सेलेब्स आहेत ज्यांनी रिहानाच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.