‘देसी गर्ल’ प्रियंकाच्या ‘ग्रॅमी’ लुकबद्दल फॅशन डिझायनर बोलला, म्हणाला – ‘काही- काही कपडे घालण्याचं एक वय असतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा पती निक जोनास सोबत नुकतीच ग्रॅमी अवॉर्ड 2020 मध्ये आली होती. आपल्या ड्रेसमुळे तिनं सर्वांचं लक्ष वेधलं. डीप नेक ड्रेसमुळे प्रियंका नंतर ट्रोलही झाली होती. इंटरनॅशनल फॅशन आयकॉन्सला प्रियंकाचा हा लुक आवडला परंतु इंडियन फॅशन डिझायनरनं मात्र प्रियंकाच्या या लाँग नेकलाईन ड्रेसची खिल्ली होती.

फॅशन डिझायनर वेंडेल रोड्रिक्सनंदेखील प्रियंकाची खिल्ली उडवत नेक लाईनच्या लांबीला लॉस एंजेलिस ते क्युबा असं महटलं होतं. यानंतर अनेकांनी रोड्रिक्सला ट्रोल केलं. यानंतर रोड्रिक्सनं पुन्हा कमेंट करत सविस्त आपलं म्हणणं सांगितलं. अनेकांनी प्रियंकाच्या बॉडी शेमिंगबद्दल रोड्रिक्सला ट्रोल केलं. परंतु तो ड्रेस शेमिंग बद्दल बोलत होता असं त्यानं स्पष्ट केलं.

रोड्रिक्सनं कमेंट करत म्हटलं की, “जे लोक म्हणत आहेत की मी बॉडी शेमिंग केलं आहे. त्यांच्यासाठी माझं उत्तर. मी तिच्या शरीराबद्दल काही बोललो आहे का. नाही. मी फक्त तिच्या ड्रेसबद्दल बोललो. मी म्हणालो की, हा ड्रेस तिच्यासाठी योग्य नाही. कारण हा डिझायनर ड्रेस होता. फक्त आरोप करू नका. माझी पोस्ट वाचा. काही कपडे घालण्यासाठी एक वय असतं. मोठं पोट असणाऱ्या लोकांनी टाईट टी शर्ट घालायचे नसतात. एका वयानंतर महिलांनी मिनी ड्रेस नाही घालायला पाहिजे. जर तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही दाखवू नका ना. प्रत्येक मुद्द्याला बॉडी शेमिंग बनवू नका.”